शिंगोली (धाराशिव): साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती शिंगोली येथील आदर्श विमुक्त जाती प्राथमिक व विद्यानिकेतन माध्यमिक आश्रम शाळेच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यानिकेतन आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दिपक खबोले होते. यावेळी आदर्श आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सतीश कुंभार, वरिष्ठ लिपिक संजीवकुमार मस्के, रत्नाकर पाटील आणि अण्णासाहेब चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
अध्यक्ष दिपक खबोले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, ते लहानपणापासून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होते. केवळ दीड दिवस शाळा शिकून गिरणी कामगार म्हणून काम करत असतानाही त्यांनी आपल्या लेखणीतून समाजातील दलीत, पिडीत, शोषित घटकांचे प्रश्न मांडले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या साहित्यावर होता.
रत्नाकर पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश देताना सांगितले की, अण्णाभाऊंच्या विचारांनी प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात नाव कमवावे. जिल्हाधिकारी, आमदार, डॉक्टर, अभियंता, वकील अशा पदांवर पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत जाधव, खंडू पडवळ, शेषेराव राठोड, सुधीर कांबळे, प्रशांत राठोड, कैलास शानिमे, मल्लिनाथ कोणदे, सचिन राठोड, इमरान शेख, सुरेखा कांबळे, ज्योती साने, बालिका बोयणे आणि ज्योती राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रद्धा सुर्यवंशी यांनी मानले.
यावेळी शिक्षक व कर्मचारी गोविंद बनसोडे, वसंत भिसे, सचिन अनंतकळवास, अविनाश घोडके, सागर सुर्यवंशी, अमोल जगताप, वसतीगृह अधीक्षक वैशाली शितोळे मॅडम यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.