उमरगा (धाराशिव): पोलिस असल्याचा बनाव करून एकाने भरदिवसा महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उमरग्यात घडली आहे. याप्रकरणी तोतीयागिरी करून 1.43 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी क्रांती भगवान कांबळे (वय 56 वर्षे, रा. माने नगर, उमरगा) या 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4.50 च्या सुमारास उमरग्यातील मुगळे हॉस्पिटलजवळून जात असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांना अडवते. “हम पोलीसवाले है, यहाँ एक औरत का खून हुआ है, तुम्हारे अंगावर खूप सोने आहे, तुमच्यासाठी धोका आहे, आम्हाला सुरक्षा ड्युटी दिली आहे,” असे म्हणत त्याने पोलिस आयकार्ड दाखवले.
त्यानंतर त्या व्यक्तीने क्रांती कांबळे यांना गळ्यातील गंठण व हातातील पाटल्या (एकूण 8.5 तोळे सोनं – अंदाजे किंमत ₹1,43,000) पर्समध्ये ठेवायला सांगितले. त्यांनी तसे केले असताना त्या व्यक्तीने नकळतपणे त्यांच्या पर्समधून दागिने काढून नेले आणि पसार झाला.
या प्रकाराची तक्रार दुसऱ्या दिवशी, 26 जुलै रोजी उमरगा पोलीस ठाण्यात दिली असून, फिर्यादीवरून भारतीय दंड विधान कलम 318(4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
#तोतीयागिरी #फसवणूक #उमरगान्यूज #धाराशिवन्यूज #धाराशिव #उस्मानाबाद #अंतरसंवादन्यूज #सोन्याचेदागिने #पोलीसबनाव
#FraudCase #GoldJewelryCheating #FakePolice #UmarkhedNews #DharashivNews #OsmanabadNews #AntarsanwadNews #CrimeAlert #JewelryScam