धाराशिवमध्ये कुत्र्याचा हैदोस! खाजानगर भागात ७ ते ८ नागरिकांना चावा

Spread the love

धाराशिव (दि. २४ जुलै) – धाराशिव शहरातील खाजानगर परिसरात मंगळवारी (२३ जुलै) सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान एका पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या पिसाळलेल्या कुत्र्याने सतत वेगवेगळ्या ठिकाणी नागरिकांवर हल्ला चढवत त्यांना जखमी केले. जखमी सर्व नागरिकांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या परिसरातील नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा जिल्हाधिकारी आणि नगरपालिकेकडे कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी अपील केले आहे की, लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नका, तसेच रस्त्यावर चालताना सतर्क राहा. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

#धाराशिव #उस्मानाबाद #धाराशिवन्यूज #उस्मानाबादन्यूज #अंतरसंवादन्यूज #OsmanabadNews #DharashivNews #DogAttack #StrayDogs #खाजानगर #धाराशिवबातमी


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!