ई-सिमच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक; सायबर पोलिसात 1.81 लाखांच्या ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल

Spread the love

धाराशिव, दि. 10 जुलै 2025 :
शेतात काम करत असलेल्या एका शेतकऱ्याच्या मोबाईलवरील मेसेजेस आणि कॉल्सचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या खात्यातून तब्बल ₹1,81,299 इतकी रक्कम ऑनलाईन चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी खाजा शानुर शेख (वय 50, रा. कोंड, ता. व जि. धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. 2 जुलै 2025 रोजी सकाळी 5.21 वाजल्यापासून ते 7 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत ते शेतात असताना त्यांचा मोबाईल क्रमांक 8658093637 वर मेसेजेस फॉरवर्ड करण्यात आले. यासोबतच 9341462633 या क्रमांकावरून कॉल करून त्यांच्या मोबाईलचा ई-सिम ॲक्सेस घेतला गेला.

या तांत्रिक फसवणुकीतून अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या महाराष्ट्र बँक खात्यातून ₹1,81,299 इतकी रक्कम परस्पर ऑनलाईन वळवली. सदर प्रकरणी दि. 9 जुलै 2025 रोजी खाजा शेख यांनी दिलेल्या प्रथक खबरीवरून सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे खालील कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे:

भारतीय दंड संहिता कलम 318(4)

माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43, 65, 66(ब), 66(क), 66(ड)

सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकींपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!