शिंगोली (ता. धाराशिव ) –
शिंगोली येथील आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महावितरण उपळा (माकडाचे) येथील कर्मचाऱ्यांकडून दमदाटी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी वादळी पावसामुळे इंग्रजी चिंचेचे एक मोठे झाड शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी राहतात त्या कॉलनीमध्ये कोसळले. हे झाड थेट वीज वाहिन्या व खांबांवर आडवे पडल्यामुळे मोठा विद्युत अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या कॉलनीच्या शेजारीच विद्यार्थी वसतीगृह असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या धोक्याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर सूचना देऊनही त्यांनी कोणतीही तातडीची कारवाई केली नाही. उलटपक्षी, शाळेचे शिक्षक व कर्मचारी झाड तोडण्यासाठी लोक बोलवू लागले असता, महावितरणचे कर्मचारी दमदाटी व उद्धट वागणूक देत असल्याचा आरोप संबंधित शिक्षकांनी केला आहे.
“बळी तो कान पिळी” ही म्हण या परिस्थितीला अगदी तंतोतंत लागू पडत आहे. “उलटा चोर कोतवाल को डाटे” अशी अवस्था निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी राम भरोसे चालू आहे, अशी टीका संतप्त शिक्षक व पालक करत आहेत.
प्रश्न हेच आहे की, एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होणार का?
—
महत्त्वाचे मुद्दे:
दोन दिवसांपासून विद्युत खांबावर झाड अडकलेले आहे
वसतीगृहाजवळच असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांशी उद्धट वर्तन
अपघात टळण्यासाठी तात्काळ हस्तक्षेपाची गरज