धाराशिव, दि. ८ जून –
धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या स्थगितीवरून निर्माण झालेला वाद आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. भाजप मंत्री नितेश राणे यांच्या “महायुतीचा बाप कोण?” या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील तणाव चव्हाट्यावर आला आहे. तर दुसरीकडे महायुतीतील राष्ट्रवादी पक्षाने आपली भूमिका प्रसार माध्यमांना आतापर्यंत योग्य समजलेले नाही.
महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका अशा विविध निवडणुका तोंडावर असताना महायुतीतील मतभेद अधिकच गडद होत असल्याचे चित्र आहे. स्थानिक नेत्यांच्या नाराजीचे पडसाद कार्यकर्त्यांमध्येही उमटू लागले आहेत.
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी भाजपवर जोरदार टीका करत म्हटले की, “महायुती ही सर्व घटक पक्षांची आहे, कोणत्याही एका पक्षाने बापगिरी करणे योग्य नाही.” त्यांनी जिल्हा नियोजन निधीची अडवणूक हा एकतर्फी निर्णय असल्याचा आरोपही केला.
या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय समितीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद भाजप-शिवसेनेच्या प्रचारावर आणि स्थानिक युतीच्या समीकरणांवर परिणाम करू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
—
ठळक मुद्दे:
नितेश राणे यांचे वक्तव्य चर्चेचा विषय
जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून मतभेद
महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महायुतीत कलह
भाजप-शिवसेना (शिंदे गट) संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता
—
#महायुतीवाद
#नितेशराणे
#शिवसेना #भाजप
#धाराशिवराजकारण #निवडणूक२०२५
#उस्मानाबादन्यूज
#धाराशिवन्यूज
#धाराशिव
#उस्मानाबाद
#अंतरसंवादन्यूज