धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्य विक्री आणि जुगार अड्ड्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक ठिकाणी छापे टाकले. मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई बुधवार, दि. २८ मे २०२५ रोजी करण्यात आली. एकूण ७ ठिकाणी अवैध मद्य विरोधात तर ५ ठिकाणी जुगार विरोधात छापे टाकण्यात आले.
अवैध मद्य विरोधात मोठ्या प्रमाणावर जप्ती
या छाप्यांमध्ये गावठी दारू, सिंधी ताडी, देशी-विदेशी मद्य अशा एकूण ६०,७६० रुपयांच्या मद्यसाठ्याची जप्ती करण्यात आली. या अनुषंगाने महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:
धाराशिव शहर पो.ठाणे (३ कारवाई):
218 लिटर गावठी दारू, 35 लिटर सिंधी ताडी व 236 लिटर गावठी दारू अशी एकूण मोठी जप्ती
आरोपी: कुणाल अनिल पवार, अमर किसन चव्हाण, नानी जगन पवार
येरमाळा पो.ठाणे (२ कारवाई):
वाघोली व चोराखळी येथे अनुक्रमे ६१ लिटर व २० लिटर गावठी दारू जप्त
आरोपी: संगिता शाहु पवार, गंगुबाई उध्दव काळे
मुरुम पो.ठाणे:
महादेव नगर, मुरुम येथे २४ लिटर गावठी दारू जप्त
आरोपी: बाळु शिवाप्पा देडे
अंबी पो.ठाणे:
उडेगाव येथे १३ बाटल्या देशी-विदेशी दारू जप्त
आरोपी: पांडुरंग रानबा गायकवाड
जुगार अड्ड्यांवर धाड – रोख रक्कम व साहित्य जप्त
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, कळंब व परंडा येथे कल्याण मटका प्रकारातील जुगार अड्ड्यांवर कारवाई करत एकूण ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कब्जातून एकूण ₹५,२१० ची रोकड आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
तुळजापूर पो.ठाणे (२ कारवाई):
आरोपी: हसन नाईकवाडी, नितीन कांबळे
ठिकाण: अपसिंगा
एकूण रक्कम: ₹९७० व ₹४५०
कळंब पो.ठाणे:
आरोपी: सुबोध थोरात, विशाल नरुटे
ठिकाण: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर
रक्कम: ₹१,५९०
परंडा पो.ठाणे:
आरोपी: तेजस जगताप
ठिकाण: परंडा बसस्थानक
रक्कम: ₹२,२००
वरील जुगार विरोधात गुन्ह्यांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांची ही धडक कारवाई जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठीचा प्रयत्न असून, पुढील काळातही अशीच कठोर कार्यवाही सुरू राहील, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.