बेकायदेशीर बांधकामावर तुळजापूर नगरपरिषदेची नोटीस; किरण इंगळेंची तक्रार सफल!

Spread the love

धाराशिव : प्रतिनिधी

तुळजापूर शहरातील बसवेश्वर भागात करण्यात आलेल्या बेकायदेशीर बांधकामावर अखेर नगरपरिषद तुळजापूरने कारवाईचा बडगा उचलत नोटीस बजावली आहे. सदर बांधकामाविरोधात किरण धोंडीबा इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत श्री. राजेंद्र दिगंबर माने यांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.

दिनांक २४ मे २०२५ रोजी दिलेल्या नोटीसीनुसार, तुळजापूर नगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे नं २६६६/१ पै पूर्व-पश्चिम ४० फुट व दक्षिण-उत्तर २५ फुट श्रीम. उमा राजेंद्र माने यांच्या नावे असुन तसेच श्री. राजेंद्र दिंगबर माने यांच्या नावे सिटी सर्वे नं. २६६६/१ असा असून, ज्याचे क्षेत्र पूर्व-पश्चिम ४० फुट व दक्षिण-उत्तर ०८ फुट असे आहे. तरी राजेंद्र दिंगबर माने व उमा राजेंद्र माने यांच्या दोघांचे मिळून पूर्व- पश्चिम ४० फुट व दक्षिण-उत्तर ३३ फुट एवढे क्षेत्र असून सदर जागेवर घराचे बांधकाम करते वेळेस पुर्व-पश्चिम ४० फुट व दक्षिण उत्तर ३३ फुट एवढ्या क्षेत्रावर बांधकाम करणे आवश्यक असताना पूर्व-पश्चिम ४० फुट व दक्षिण -उत्तर ४० फुट बांधकाम केल्याचे निदर्शनास येते. तरी उत्तर-दक्षिण ७ फुट इतक्या क्षेत्रावरील अतिरिक्त अनाधिकृत बेकादेशीर बांधकाम आहे असे असे नोटीस मध्ये म्हटले आहे.

नगरपरिषदेच्या म्हणण्यानुसार, सदर बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाच्या कलम ५३(१) चे उल्लंघन असून, कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे श्री. माने यांना ३० दिवसांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा नियमाच्या तरतुदीनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येईल असे व बांधकामधारक जबाबदार राहील, असा इशाराही मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी दिला आहे.

या प्रकरणाची तपासणी व कारवाई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व नगर रचना अभियंता यांच्या हस्ते करण्यात आली आहे. किरण इंगळे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे नोटीस मध्ये एक प्रत इंगळे यांना दिली आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!