शेकापूर ग्रामपंचायतचा इशारा : महावितरण व महापारेषणच्या मालमत्तेवर कारवाई ठरली!

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – शेकापूर (ता. धाराशिव) येथील ग्रामपंचायतीने वीज विभागाच्या दोन कार्यालयांना वेळेत कर भरण्याचे आदेश देऊनही त्यांनी दुर्लक्ष केल्याने आता थेट मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. १६ मे २०२५ रोजी महावितरण (MSEDCL) आणि महापारेषण (MSETCL) या दोन्ही कार्यालयांना ७ दिवसात ग्रामपंचायत कर भरण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आले होते. मात्र, मुदत २३ मे रोजी संपूनही कर न भरल्यामुळे ग्रामपंचायतीने येत्या २४ मे रोजी मालमत्ता जप्तीची कारवाई करण्याची तयारी केली आहे.

या कारवाईदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामपंचायतीने धाराशिव शहर पोलीस स्टेशनकडे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या बंदोबस्ताचा शुल्क ग्रामपंचायतीकडून भरला जाणार आहे.

ही कारवाई ग्रामपंचायतीच्या महसुलाच्या वसुलीसाठी ठोस पावले उचलल्याचे संकेत देत असून, यामुळे इतर थकबाकीदारांवरही दडपण येण्याची शक्यता आहे.

प्राथमिक माहितीप्रमाणे –

महापारेषण (MSETCL) वर 28,40,400 रुपये

महावितरण (MSEDCL) वर 84,65,000 रुपये
इतका कर थकित आहे.

– अंतरसंवाद News


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!