धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील बौध्दनगर येथे विश्वाला शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त एकात्मता व सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ज्ञानसूर्य बी.आर. आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि बी.आर. आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी त्रिशरण आणि पंचशील यांचे ग्रहण केले.
या निमित्ताने परिसरातील नागरिकांसाठी अन्नदान आणि खीरदानाचेही आयोजन करण्यात आले. यावेळी बौध्दनगरमधील सर्वच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.