राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज आदर्श उपसरपंच पुरस्काराने अतुल चव्हाण सन्मानित 

Spread the love

धाराशिव: तालुक्यातील सकनेवाडी येथील ठाकरे गटाचे  उपसरपंच तथा कट्टर शिवसैनिक अतुल सूर्यकांत चव्हाण यांना अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज आदर्श उपसरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. उपसरपंच चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात गावासाठी रस्ते, पाणी पुरवठा, जि. प. शाळा विकास, कृषी योजना, डांबरी रस्ते, घरकुल आदी योजना राबविल्या आहेत. या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय, इंगळी (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यांच्या वतीने राज्यस्तरीय छत्रपती शाहू महाराज आदर्श उपसरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. उपसरपंच अतुल चव्हाण यांना या पुरस्काराचे रविवारी (दि. ११ मे) २४ वे शंभुराजे ग्रामीण साहित्य संमेलनात, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. अतुल चव्हाण यांनी गावासाठी रस्ते, पाणी पुरवठा, जि. प. शाळा विकास, कृषी योजना, घरकुल आदी योजना राबविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल धाराशिव-कळंब मतदारसंघाचे विद्यमान आमदार कैलास घाडगे-पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अभिनंदन करून श्री चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे श्री चव्हाण यांनी सकनेवाडी सारख्या छोट्याशा गावात जिथे शेतकऱ्यांना जाण्यासाठी शेतात धड रस्ताही नव्हता तिथे त्यांनी डांबरी रस्ते करून एक नवा आदर्श उभा केला आहे. 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!