धाराशिव – खामगाव येथील युवा नेते तथा माजी सरपंच मनोगत (पिंचु भैय्या) सिनगारे यांच्या वाढदिवसा निमित्त तुळजाईं प्रतिष्ठान बहु.संस्था संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह , विमानतळ रोड,आळणी. ता. जि.धाराशिव येथे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले. यावेळी शिनगारे यांच्या कुटुंबातील सदस्यांसह संस्थेचे कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवा नेते तथा माजी सरपंच मनोगत शिनगारे यांचा हा वाढदिवस स्व आधार मतिमंद मुलींचे बालगृह आळणी येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू दप्तर, वही, पेन खाऊ वाटप करत साजरा केला. विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
ह्या कार्यक्रमासाठी सहपरिवार ,मित्रपरिवार ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शिक्षक वर्ग, सर्व कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.