मुंबई :
सध्या अनेक वापरकर्ते “मेसेज जात नाहीये”, “ब्लू टिक दिसत नाहीत”, किंवा “WhatsApp चालत नाहीये” अशी तक्रार करत आहेत. कारण म्हणजे WhatsApp सध्या डाऊन झालं आहे. आज (१२ एप्रिल २०२५) दुपारपासून वापरकर्त्यांना मेसेज पाठवण्यात आणि प्राप्त करण्यात अडथळा येत आहे.
हे जागतिक स्वरूपाचं तांत्रिक बिघाड असल्याचे प्राथमिक वृत्त असून, वापरकर्त्यांनी काळजी न करता थोडा वेळ थांबावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. Meta कंपनीकडून (WhatsApp चे मूळ कंपनी) अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली, तरी तांत्रिक पथक हे समस्येचे समाधान करण्यासाठी कार्यरत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर #WhatsAppDown हा ट्रेंड देखील व्हायरल होत आहे. वापरकर्त्यांनी पर्यायी अॅप्स किंवा SMS चा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
तुमचाही मेसेज जात नसेल, तर काळजी करू नका – ही सर्वसामान्य तांत्रिक अडचण आहे, लवकरच सेवा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.