घाटकोपर फ्लायओव्हरवर अपघात; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मदतीचा हात देत दिला माणुसकीचा संदेश

Spread the love

🗓️ १० एप्रिल २०२५ | 📍 घाटकोपर

मुंबईतील घाटकोपर फ्लायओव्हरवर आज संध्याकाळी एक दुचाकीस्वार अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली. रस्त्यावर पडलेला दुचाकीस्वार पाहून राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःचे वाहन थांबवत तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावले.

मंत्री सरनाईक यांनी अपघातग्रस्ताची विचारपूस केली, त्याला उभं केलं आणि तातडीने वैद्यकीय मदतीची व्यवस्था करून एक संवेदनशील भूमिका बजावली. यावेळी त्यांनी सांगितले, “मंत्री म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून मदतीचा हात दिला. माणुसकी हीच खरी ओळख असते.”

घटनास्थळी उपस्थित लोकांमध्येही त्यांच्या या वागणुकीमुळे एक सकारात्मक संदेश गेला. अनेकांनी त्यांच्या तत्परतेचे आणि माणुसकीच्या भावनेचे कौतुक केले आहे.

– अंतरसंवाद न्यूज


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!