
तुळजापूर तालुक्यातील
नळदुर्ग व परीसरातील नागरिकांच्या सोई करिता नळदुर्ग ला अप्पर तहसील कार्यालय मंजुर करण्यात आले होते. या भागातील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी महायुती सरकारने पुर्ण केली आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष अपेक्षित कामाला सुरवात झाली आहे. तालुका स्तरावरील दाखल्यांसाठी जळकोट व नळदुर्ग महसुल मंडळातील नागरिकांना आता तुळजापूरला जाण्याची गरज भासणार नाही.
अप्पर तहसीलदार श्री.अभिजीत जगताप यांनी दि.०४ रोजी नळदुर्ग येथे तलाठी व कोतवाल यांची बैठक घेतली. सध्या या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. या कार्यालयासाठी दोन नियमीत पदांना मंजुरी असुन नियमीत वेतन श्रेणीवर वाढीव पदे मंजुर करण्याची विनंती महसुल मंत्री ना.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या कडे करण्यात आली आहे. कालपासून कार्यालयात अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरील कार्यालयात प्रत्यक्ष कामकाज सुरु झाल्याने या भागातील नागरिकांना नक्कीच मोठा फायदा होईल असा आशावाद आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केला आहे.