धाराशिव शहरात सण/उत्सवा निमीत्त पोलिसांचा रूट मार्च व पेट्रोलिंग.

Spread the love

 

धाराशिव, दि. 05 एप्रिल 2025 आगामी काळात साजरा होणाऱ्या रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, या पार्श्वभुमीवर मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली  आनंदनगर पोलीसांनी धाराशिव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धाराशिव शहरात पोलिसांनी  पेट्रोलिंग व रूट मार्च काढला. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा रूट मार्च व पेट्रोलिंगचे आयोजिन करण्यात आले होते. हा रुट मार्च व पेट्रोलिंग आनंदनगर पोलीस स्टेशनपासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संपन्न झाला. रूट मार्च मार्ग पोलीस स्टेशन येथून निघून सेंट्रल बिल्डींग चौक, महात्मा बस्वेश्वर चौक, माणिक चौक, जिजाउ चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक समोरुन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत होता. पेट्रोलिंग व रुट मार्च मध्ये 4 अधिकारी, 30 पोलीस अंमलदार, 10 होमगार्ड हजर होते. या मार्चद्वारे पोलिसांनी शहरातील प्रमुख भागांतून आपली उपस्थिती दर्शवली आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली. आगामी काळातील सण/उत्सवाचे पार्श्वभुमीवर, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली. शहरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना पाठिंबा दर्शवला आहे. या रूट मार्च व पेट्रोलिंगचे आयोजनामुळे धाराशिव शहरात सणाचे उत्साहासोबतच सुरक्षिततेचे वातावरणही निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!