
धाराशिव –
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे ॲड. तुकाराम महानंदा नारायण शिंदे यांची आंदोलन समन्वयक या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक ३ एप्रिल २०२५ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत नेमणूक पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांचा पदाचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार आहे.
या नेमणुकीनंतर ॲड.तुकाराम शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण समाजात पोहोचविण्यासाठी सक्रीयपणे कार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. शिवसेना पक्ष बळकट करण्यासाठी आपले सर्वस्व झोकून देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या नियुक्तीचे पत्र शिवसेना सचिव संजय पूज्यलता भाऊसाहेब मोरे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे.