पी.एम. किसान एपीके लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे बँक खाते रिकामे!

Spread the love

धाराशिव: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या “PM Kisan list. APK” किंवा “PM Kisan APK” लिंकवर क्लिक करताच त्यांचे बँक खाते रिकामे होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

शासन निर्णय क्र.- किसनि २०२३/प्र.क्र. ४२/११-अ, दिनांक १५ जून २०२३ नुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबवली जाते. मात्र, सायबर फसवणुकीसाठी काही अज्ञात व्यक्ती या योजनेच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.

काय काळजी घ्यावी?

  • PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK नावाच्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
  • अशा लिंकद्वारे तुमची वैयक्तिक माहिती व बँक खाते तपशील चोरी होण्याची शक्यता आहे.
  • जर कोणत्याही शेतकऱ्याची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी त्वरित जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने यांनी स्पष्ट केले की, या प्रकारच्या फसवणुकीबाबत सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईट आणि कृषि विभागाच्या विश्वासार्ह स्त्रोतांमधूनच माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!