धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उडान पुलाची तातडीची आवश्यकता
धाराशिव: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, या ठिकाणी उड्डान पुलाची तातडीची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या मुख्य चौकांपैकी एक असलेल्या या चौकात सतत वाहनांची वर्दळ असते. तसेच, विविध आंदोलनं, मोर्चे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
वाहतुकीला मोठा अडथळा
शहरातील महत्त्वाच्या मार्गांपैकी बार्शी रोड, छ्त्रपती संभाजीनगर रोड, औसा रोड आणि सोलापूर रोड येथे ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. शिवाय, बार्शीहून येणाऱ्या वाहनांना सांजा रोडकडे जाण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात, सोलापूर पूल आलेल्या अशा कडे जाणाऱ्या वाहनांना देखील हेलपाटे मारावे लागतात ज्यामुळे प्रवाशांना वेळ वाया घालवावा लागतो. तसेच, अतिक्रमणामुळे रस्त्यांची जागा कमी होत असून, वाहतुकीचा ताण अधिक वाढत आहे.
अपघातांचे वाढते प्रमाण
वाहतुकीच्या अनियमिततेमुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. वाहने चुकीच्या दिशेने जाण्याचे प्रकार वाढले असून, पादचाऱ्यांसाठीही हा चौक धोकादायक बनला आहे. जर येथे उडान पूल बांधण्यात आला, तर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल आणि वाहतूक सुरळीत होईल. अंडरग्राउंड रस्ता काढला अधीक बरे होईल.
प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत – नागरिकांची मागणी
शहरातील नागरिक आणि व्यापारी वर्गाने प्रशासनाकडे वारंवार याबाबत तक्रारी केल्या आहेत. उड्डान पूल उभारल्यास वेळेची बचत होईल आणि वाहतुकीला गतिमानता मिळेल, असा नागरिकांचा विश्वास आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून उड्डान पुलाचा प्रस्ताव मंजूर करून घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा निर्णय
उडान पूल उभारल्यास धाराशिव शहराच्या विकासाला चालना मिळेल. अपघातांचे प्रमाण कमी होईल, वाहनधारक आणि प्रवाशांना दिलासा मिळेल. यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
– धाराशिव प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो…



