धाराशिव : एका ठेकेदाराने स्वच्छता केली जात नव्हती म्हणून मुदत संपल्यानंतर दुसरा ठेकेदार स्वच्छतेसाठी एक वर्ष अगोदर एका बारामती च्या ठेकेदाराला स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली मात्र त्या ठेकेदाराकडून शहरात पूर्ण स्वच्छता केली जात नाही नागरिकांनी अनेक तक्रारी केल्यानंतर देखील ठेकेदारावर नगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडून कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. ठेकेदार बदलला तरीही प्रभागात वार्डात तोच पर्यवेक्षक ( सुपरवायझर ) आहेत. त्यामुळे शहरात सर्व भागांमधील नाल्या तुंबल्या आहेत. टेंडर प्रक्रिया करताना नगरपालिकेने दिलेल्या नियमांचे ठेकेदाराकडून कसल्या प्रकारचे पालन होत नाही. तसेच शहरात असलेल्या कचरकुंडीत देखील कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आलेले नाही. ठेकेदाराकडून शहरात पूर्ण स्वच्छता केली जात नाही. मुख्य रस्त्यावर स्वच्छता करून तोंड पुसण्याचे काम केले जात आहे.
आज दि 16 फेब्रुवारी 2025 रोजी ठेकेदाराने तीन आठवड्यापासून वेतन न दिल्याने सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. आम्ही कसल्याही प्रकारचे कुणालाही निवेदन दिले नाही व देणार ही नाही व प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया ही देणार नाहीत या अगोदरच्या ठेकेदाराने देखील प्रसारमाध्यमांना तक्रार दिल्यानंतर कामावरून काढून टाकले होते त्यामुळे आम्ही आमच्या हातात आहे तेवढेच करणार आहोत आम्ही बेमुदत काम बंद करून एकत्रित ठेकेदाराचा निषेध करणार आहोत अशी प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर देण्यात आली आहे. नगरपालिकेने आतापर्यंत आमची एक ही बिल काढलेले नाही त्यामुळे बिल निघाल्यावर वेतन देतो असे म्हणत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी तीन आठवडे झाले कर्मचाऱ्यांना वेतन दिलेले नाही.
नगरपालिकेत दर महिन्याला अंदाजे 72 लाख 50 हजार रुपये स्वच्छ साठी खर्च केला जात आहे अशी प्राथमिक माहिती आहे तर. नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 50 ते 55 लाख रुपये चे दर महिन्याला बिल ठेकेदाराकडून सादर करण्यात येते. अशी माहिती देण्यात आली आहे. शहरात पूर्णपणे काम न करता ठेकेदाराकडून बिल जमा केले जाते. काम न करता बिल जमा करणाऱ्या दारावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. मात्र शहरातील स्वच्छतेचे काम न करता बिल जमा करून घेतले जात आहे. आज नाहीतर उद्या ठेकेदाराचे बिल निघेल मात्र स्वच्छता न करता बिल देणे हा गैरप्रकार आहे. अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांनी दिली आहे.