वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-हनुमान नाना हुंबे, वय 35 वर्षे, रा.ईट ता. भुम जि. धाराशिव यांचे राहते घराचे लोखंडी गेटची आतील कडी अज्ञात व्यक्तीने दि.14.02.2025 रोजी 22.30 ते दि. 15.02.2025 रोजी 02.45 वा. सु. दरवाजा उघडून आत प्रवेश करुन घरातील 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 30,000₹ असा एकुण70,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हनुमान हुंबे यांनी दि.15.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4),305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :दि.14.02.2025 रोजी 18.30 ते दि. 15.02.2025 रोजी 07.45 वा. सु. बिरोबा मंदीर ढोकी शिवार माळरान येथे व्ही.एम.आर. ग्रीन एनर्जी प्रा.लि. ढोकी सोलार प्लॅट येथील कामावरील पाच इनव्हरटरचे व तीन मॉडल टेबलचे केबल वायर अंदाजे 2,500 मिटर अंदाजे 70,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अभिजीत अनिल कोकाटे, वय 22 वर्षे, रा. पोस्ट ऑफीस शेजारी ढोकी ता. जि. धाराशिव यांनी दि.15.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- वैभव सुरेश पाटील, वय 26 वर्षे, रा. साळुंखे नगर, धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची होंडा शाईन कंपनीची लाल रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एएच 0743 ही दि.04.02.2025 रोजी 20.00 ते दि. 06.02.2025 रोजी 19.00 वा. सु. विसर्जन विहीर जिल्हा परिषद क्वॉर्टर जवळ धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वैभव पाटील यांनी दि.15.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंनदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.