धाराशिव जिल्ह्यातील दोन ठिकाणी जुगार विरोधी कारवाई

Spread the love

तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.15.02.2025 रोजी 15.30वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत जुने बसस्थानक समोरील रोचकरी कॉम्पलेक्स मधील आर के ट्रॅव्हल्स शेजारील गाळ्याचे पत्राचे शेडमध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सचिन अंबादास घोलकर, वय 34 वर्षे, रा. हाडको आयोध्या नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, अमोल अशोक साळवे, वय 34 वर्षे, रा. आमृतवाउी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 15.30 वा.सु जुने बसस्थानक समोरील रोचकरी कॉम्पलेक्स मधील आर के ट्रॅव्हल्स शेजारील गाळ्याचे पत्राचे शेडमध्ये चक्री मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 16,900 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.15.02.2025 रोजी 15.20 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत कसगी गावातील बसवेश्वर चौक येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-निंगण्णा नागण्णा रुगी, वय 42 वर्षे, रा. शांतलिंगेश्वर हायशंट दुधनी, अक्कलकोट सोलापूर ह.मु. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव, हे18.00 वा.सु कसगी गावातील बसवेश्वर चौक येथे मिलन डे मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!