केंद्रीय प्राथमिक शाळा पारा या ठिकाणी बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा

Spread the love

वाशी :  ( प्रतिनिधी ) दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा पारा या ठिकाणी शाळेसमोरील मैदानात बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतः पाककृती बनवून वडापाव,टोमॅटो सॉस, पुरी भाजी, गुलाब जामून, हरभऱ्याचे डहाळे, इडली सांबार, उडीद वडा, चिकन बिर्याणी, पेरूचे दुकान, पॅटीस, अशा विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून विक्री केले व त्यातून खरी कमाई कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला हा आनंद घेण्यासाठी पारा गावातील पारेकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विष्णू हिंगने, उद्धव शेळके( ग्रामपंचायत सदस्य पारा) , पानसे सर, राहुल शेळके  ( पत्रकार ),राजेंद्र काशीद ( सरपंच ग्रामपंचायत  पारा), अतुल चौधरी( उपसरपंच ग्रामपंचायत  पारा ) शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंगत काशीद, माझी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम भराटे, तसेच गावातील नागरिकांनी उपस्थिती नोंदवून खाद्यपदार्थाचे सेवन करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. विशाल गायकवाड सर, पद्माकर जोगदंड सर, अशोक गिरी सर, गावकरी सर, पाळवदे मॅडम, भोसले मॅडम, ओव्हाळ मॅडम, कांबळे सर, राजेश फेरे सर, ठोंबरे सर, व मुख्याध्यापक श्रीमंत मोठे सर यांनी मार्गदर्शन करून बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला व गावातील नागरिकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्यात महिला भगिनीचाही होता .


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!