देवधानोरा गावातून उद्या रविवारी आमदार कैलास पाटील यांच्या प्रचाराचे नारळ फुटणार

Spread the love

धाराशिव ता. 2 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात होत आहे. आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील मुळगाव देवधानोरा येथील ग्रामदैवत श्री खंडोबास नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. खासदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टार प्रचारक ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार आहे. 

महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार कैलास घाडगे पाटील यांनी आपल्या मूळगावातूनच प्रचाराला सुरवात करणार आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या व गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाने आमदार घाडगे पाटील नाव घराघरात पोहचल आहे. शिवाय सहज उपलब्ध होणारा आमदार आणि कोणत्याही अमिषाला बळी नं पडता पक्षाशी व मतदाराशी एकनिष्ठ राहिलेल्या कैलास पाटील यांची राज्यभर अशी चर्चा झाली. त्यांच्या या एकनिष्ठ राहण्याचे फळ आमदार घाडगे पाटील यांना पक्षाने दिल आहे. पहिल्याच यादीत त्यांच्या नावाची घोषणा झाली, जनतेच्या दरबारात जाऊन ते आशीर्वाद मागणार आहेत, त्याच प्रचाराची सुरवात आपल्या गावातील खंडोबा देवस्थानचा आशीर्वाद घेऊन करत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी जमलेल्या समुदायांसमोर ते आपली भूमिका मांडणार आहेत. निष्ठावंत आमदार कैलास पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ करण्यासाठी शिवसैनिक तथा महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप मेटे यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!