Dharashiv :
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र, स्कूल बॅग, शाल - श्रीफळ व शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला तसेच विविध समाजातील श्री संतोष तौर, श्री गुणवंत सुतार, इ. 13 समाजसेवकांना ज्येष्ठ समाजसेवक, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना युवा 'लहुजीरत्न पुरस्कार 2024' देऊन सन्मान व भव्य नागरिक सत्कार करण्यात आला. लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश अध्यक्ष श्री कैलास खंदारे यांनी समाजाप्रती परखड मत व्यक्त केले. आमदार अमित गोरखे साहेबांच्या माध्यमातून आपला आवाज विधानसभेत उठवण्यासाठी हक्काचा माणूस आहेत. राज्य सरकारने केलेल्या समाजाच्या कार्याचा विस्तृत आढावा कैलास खंदारे यांनी घेतला. सत्कारमूर्ती व नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य माननीय आमदार श्री अमितजी गोरखे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. लहुजी शक्ती सेनेचा लढा समजासमोर ठेवला. आरक्षित मुद्दे व समाजाच्या मागण्या विधानसभेच्या सभागृहात मांडण्यासाठी पाठवले आहे. मा.आमदार गोरखे साहेबांनी लहुजी शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व प्रदेश अध्यक्ष श्री कैलास दादा खंदारे यांचे समाजाच्या हितासाठी ओढ व तळमळ असल्याचे सांगितले. असा कार्यक्रम आपल्या भागात पहिल्यांदाच झाला असेल असेही ते बोलले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णू भाऊ कसबे साहेब हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर सौ सरोजनीताई संतोष राऊत यांची उपस्थिती होती डॉ. सरोजनीताई राऊत यांनी उद्घाटनीय सत्रात बोलताना लहुजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जीवनशैली व युद्धशैली समाजासमोर ठेवल्या. क्रांतीगुरू लहुजी राघोजी साळवे हे भारतीय क्रांतिकारक होते. लहुजी हे 'वस्ताद' या नावाने सर्वांना परिचीत आहेत. लहुजी वस्ताद यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात काम करत होते. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजींच्या आजोबांकडे सोपवली गेली होती. लहुजी वस्तादांनी दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये वेगळी शैली तयार केली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे त्यांनी ठरविले. हा इतिहास प्रांजळ भावनेने समाजासमोर ठेवण्यास मान्यवर विसरले नाहीत. डॉ.सौ. सरोजनीताई संतोष राऊत यांनी श्रीलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रीय सहभाग घेऊन पक्षा मध्ये पक्षाने दिलेली जबाबदारी व कार्य यशस्वी करणे. सर्व चळवळी मध्ये व पार्टीच्या विविध कार्यक्रमात हिरीरीने पुढाकार घेऊन केलेल्या कार्याचा आढावा लहुजी शक्ति सेनेच्या माध्यमातून करून दिला. डॉ.सरोजनीताईंनी जबाबदार कार्यकर्ती या नात्याने दायित्व प्राप्त झाल्यापासून ते आजपर्यंत, ग्रामविकास, पर्यटन विकास, सांस्कृतिक विकास, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तिर्थ क्षेत्र विकास, अल्पसंख्याक विकास, रोजगार हमी, शेत रस्ते, पेवर ब्लॉकची कामे, सिमेट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण इ. प्रकारच्या विविध विकास कामांना गती दिली. यातूनच जिल्हयातल्या विविध समस्यांवर प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हयातील महत्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. कळंब धाराशिव मतदारसंघात नवनवीन विकास योजना, नवे विस्तारीकरण, पाणी टंचाई यासंदर्भात अशा अनेक विषयांवरील ताईनी अभ्यास पूर्ण योजना राबवून जवळपास साठ कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला. हे केवळ स्वतःच्या वॉर्डापुरते अथवा गावच्या हद्दीपुरते मर्यादित न ठेवता कळंब धाराशिव मतदार क्षेत्रात कार्य केले आणि त्यामुळेच जिल्हयातले बहुतांश लोक जोडले गेले. अशा शब्दात ताईंच्या कार्याचा उल्लेख श्री बालाजी भाऊ गायकवाड व समितीकडून आवर्जून केला. लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री कैलास दादा खंदारे, युवक प्रदेशाध्यक्ष श्री सचिन भाऊ शिरसागर, महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई लोंढे, प्रदेश कार्याध्यक्ष श्री युवराज जाधव, प्रदेश उपाध्यक्ष श्री शिवाजी भाऊ गायकवाड श्री अमोल भाऊ चव्हाण, इ. कार्यकर्ते व जवळपास तीन ते चार हजार संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष तथा निमंत्रक लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश महासचिव तथा धाराशिव जिल्हा कोर कमिटी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री बालाजी भाऊ गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केलेले होते. आमदार अमितजी गोरखे साहेब व डॉ. सरोजनीताई राऊत यांनी कार्यक्रम संपन्न झाला ते लागलीच पुढे कळंब शहरातील आण्णा भाऊ साठे चौक येथे आण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. पुढे हासेगाव (शि.) येथे डॉ. सरोजनीताई संतोष राऊत यांच्या कार्यालयास भेट देवून श्रीलक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कळंब धाराशिव मतदार संघात चालू असलेल्या कार्याची माहिती घेतली. आमदार श्री अमित गोरखे साहेब व डॉ. सरोजनीताई राऊत यांनी कळंब येथे 3,500 पेक्षा अधिक लोकांशी संवाद साधला तर, डिकसळ 200, हासेगाव (शि.) येथे 100, ढोकी येथे 250, येडशी येथे 200, येरमाळा येथे 400 कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी घेत जवळपास एक दिवसात 5,000 कार्यकर्त्यांशी संवाद साधला.