श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेटच्या सभासदांना १० टक्के लाभांश – संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा

Spread the love

ठेवींपेक्षा संस्थेचा स्व-निधी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार

धाराशिव- श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा श्री सिध्दीविनायक परिवारचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केली. ठेवींपेक्षा स्व-भाग भांडवल वाढवीण्यार भर देणार असल्याचे यावेळी सांगितले.

श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, १७ ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी ते बोलत होते. सभेस प्रमुख अतिथी म्हणून प्रगती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, श्री विठ्ठल सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील, विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष रवींद्र कदम, मधुकरराव जाधव, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट सोसायटीचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी, नागेश नाईक, अ‍ॅड.नितीन भोसले, योगेश कुलकर्णी, बालाजी कोरे, गणेश कामटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, सिध्दीविनायक मल्टीस्टेट सोसायटी ही ११ शाखांमार्फत ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवित असून २६ हजार सभासद बँकेच्या सेवेने समाधानी आहेत. मागील वर्षात संस्थेला ३ कोटी ६४ लाख रुपयांचा नफा झाला असल्यामुळे सभासदांना या आर्थिक वर्षात १० टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर संस्थेचा स्वनिधी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी संचालक मंडळाला केले.

सभेत उपस्थित मान्यवरांनीही संस्थेच्या कार्याचे अभिनंदन करुन संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले. प्रारंभी बँकेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. सभेत मांडलेल्या ठरावांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली. सर्वसाधारण सभेचे प्रास्ताविक राजकुमार जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिक देवळे यांनी तर आभारप्रदर्शन देवीदास कुलकर्णी यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!