धाराशिव दि.12 ) एकात्मिक बालविकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प वाशी अंतर्गत गावामध्ये ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मिनी अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून 12 ऑगस्टपासून आवेदन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. कार्यालयीन वेळेत 26 ऑगस्टपर्यंत आवेदन अर्ज कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.
वाशी तालुक्यात खालील गावातंर्गत मिनी अंगणवाडी मदतनीस पदासाठी पात्र महिला उमेदवारांकडून विहित नमुन्यात आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत.यामध्ये पारगाव येथील दोन अंगणवाडीसाठी प्रत्येकी 1, जनकापूर पवार वस्ती मधील अंगणवाडीसाठी 1, पिंपळगाव क (पारधी वस्ती) 1, तांदूळवाडी (साखर कारखाना) 1, मांडवा (पारधी वस्ती) 1, इंदापूर (साखर कारखाना ) 1, सोनारवाडी (नांदूरकी वस्ती)1, सरमकुंडी (फाटा) 1,गोलेगाव 1,पारा 1, पिंपळगाव लिंगी (झोपडपटटी वस्ती) 1, पिंपळगाव (को) तांबडे वस्ती 1,तेरखेडा नं.01 पारधी वस्ती 1,फक्राबाद मुरकुटे बिक्कड वस्ती 1 या रिक्त जागा भरावयाच्या आहेत, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण प्रकल्प वाशी यांनी कळविले आहे.