धाराशिव दि.02 ) राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येत आहे.
सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन पिकातील मुल्यसाखळीस चालना देण्यासाठी सन 2024-25 मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगाममध्ये निविष्ठा 100 टक्के अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करावे.
अर्ज करण्यासाठी जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत 6 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया मागील 10 दिवसापासून पोर्टलवर सुरु करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.
जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in-farmerlogin या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन करण्यात जिल्हा कृषी अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.