शासकीय दूध संघाची एक एकर जागा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी मंजूर , जयंतीदिनीच शासन आदेश; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Spread the love

धाराशिव, दि. 1 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शहरातील शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा राज्य सरकारने मंजूर केली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनीच जागा मंजूर केल्याचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वर्षां पासून प्रलंबित असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकारले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याकरिता धाराशिव शहरातील शासकीय दुध शितकरण केंद्राची जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. राज्य सरकारने गुरुवारी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी ऐतिहासिक निर्णय घेत शासकीय दूध शीतकरण केंद्राची एक एकर जागा महसुल व वन विभागाकडे प्रत्यार्पीत करण्याचा शासन निर्णय घेतला असल्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व महायुती सरकारचे आमदार पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवादही व्यक्त केले आहेत. आजच्या दिवशी हा निर्णय आल्याने एक अलौकीक समाधान आपल्याला लाभले असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊंचे कार्य समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्या या अनमोल कामात थोडेसे योगदान देण्याची संधी यानिमित्ताने आपल्या वाट्याला आली असल्याचे समाधान आमदार पाटील यांनी व्यक्त केले आहे. जयंतीच्या पूर्वसंध्येलाच हा शासन निर्णय निर्गमीत करण्याचे प्रयत्न होते. गुरुवारी मात्र आर्वजुन मुंबईत थांबुन अण्णाभाऊ साठे यांना या शासन निर्णयाच्या माध्यमातून अभिवादन करता आल्याने विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

धाराशिव शहरातील शासकीय दुध डेअरीच्या जागेमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा ही अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे तसा अधिकृत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यासाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा केल्यामुळे आज या ऐतिहासिक दिवशी मागणीला यश आले आहे. दुग्धविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय दुध शितकरण केंद्राची सर्व्हे नं.426 मधील एक एकर जागा साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्यासाठी महसुल व वन विभागास जमीन प्रत्यार्पित करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक उभारण्यासाठी यापूर्वीच एक कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!