धाराशिव दि.01 ):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील इयत्ता 11 वी,12 वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता व निर्वाह भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधेसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे.
या योजनेसाठी सन 2024-25 पासून ऑनलाईल पोर्टल नव्याने कार्यरत होत आहे. शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता एकत्रित तयार केले आहे.शासकीय वसतिगृहास ऑनलाईन अर्ज करणाऱ्या ज्या पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेअभावी निवड वसतिगृहात झालेली नाही,अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रणालीद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता ग्राह्य धरले जाणार आहे.
सन 2024-25 पासून ज्या पात्र अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणेकरिता अर्ज केलेला आहे,परंतु गुणवत्तेअभावी शासकीय वसतिगृहात त्यांची निवड झालेली नाही अशाच विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील,असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे.