dharashiv : मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक अपोमंस/प्रशिक्षण/ पोशि भरती 2022-23/173/2023/966 दिनांक 16.07.2024 अन्वये सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीमध्ये आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातुन आवदेन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग अथवा खुल्या प्रवर्गात समावून घेणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.
मराठा समाजातील उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक(EWS) या प्रवर्गातुन आवेदन अर्ज सादर केला आहे. अशा उमेदवारांना कार्यालयात बोलावून त्यांना आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गा ऐवजी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC) व इतर मागास प्रवर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (OPEN) या तीन पैकी एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो. ही बाब समजावून सांगावी व त्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (SEBC) ईतर मागास प्रवर्ग (OBC) व खुला प्रवर्ग (OPEN) यातीन पैकी एका प्रवर्गाची निवड करुन त्याबाबतचे हमीपत्र त्यांचेकडून प्राप्त करुन घ्यावे व निवड केलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त करणेसाठी एक महिन्याची मुदत देण्यात यावी व ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातुन निवड द्यावी. अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत.
मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील प्रस्तुत सुचनेप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक(EWS) या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवार यांनी वरील प्रमाणे हमीपत्र भरुन देण्यासाठी दिनांक 23.07.2024 ते दिनांक 25.07.2024 या कालावधीत पोलीस भरती कक्ष.आस्थापना शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथे नचुकता हजर राहावे. आर्थिक दुर्बल घटक(EWS) या प्रवर्गातुन आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवार हमी पत्र भरुन देण्यासाठी हजर न राहिल्यास त्यांचा आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गाचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही.