धाराशिव दि.22, ) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत समुपदेशक या पदासाठीच्या दोन जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.त्याचा तपशील पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.
पदाचे नाव- समुपदेशक- शैक्षणिक अर्हता-मान्यता प्राप्त विद्यापीठाची/ संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (MSW) किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची /संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदवीका (Advance Diploma in psyholgy) अर्ज करण्याचा दिनांक व पत्ता- २३ ते ३० जुलै-२०२४ पर्यंत विभाग नियंत्रक,विभाग नियंत्रक कार्यालय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ,राज्य परिवहन महामंडळ,धाराशिव येथे सादर करावे.
या पदासाठी अनुभव- समुपदेशन क्षेत्रातील शासकीय/निम शासकीय/मोठ्या खाजगी संस्थामधील किमान -२ वर्षांचा अनुभव असावा.
इतर अटी व शर्ती-रा.प.महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकाची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल.त्याकरिता मासिक मानधन 4 हजार रुपये देण्यात येईल.प्रथम एक वर्षासाठी या पदी मानद तत्वावर नेमणूक देण्यात येईल.या काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे ही नेमणूक चालु ठेवण्याची किंवा नाही हे ठरविण्यात येईल.
कर्तव्य-रा.प.महामंडळातील कर्मचा-यांमध्ये समुपदेशनाद्वारे मानसिक ताणतणावाचे निवारण करणे,त्यांच्याशी वैयक्तीक संवाद साधून अडी-अडचणी समजावून घेऊन वैयक्तीक पातळीवर निराकरण करणे व आवश्यकता वाटल्यास वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवून पुढील उपचारांची गरज निदर्शनास आणून देणे,तसेच आगारास महिन्यातून किमान तीन वेळा भेटी देणे,
नेमणुकीचा कालावधी- ही नेमणूक केवळ मानद तत्वावर असून नेमणूकीचा कालावधी १ वर्ष राहील. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणूकीचा कालावधी संबंधित विभागामार्फत वाढविण्यात येईल.
नियुक्ती मानद तत्वावर असल्याने रा.प महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे / सामावून घेण्याचे व नियमीत सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार / हक्क अर्जदारास / समुपदेशकास नसतील तसेच सक्षम प्राधिकारी नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
अर्ज करण्याची पध्दत ही वरील अर्हताप्राप्त करणा-या उमेदवाराने फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखीत करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला / शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा,अर्ज आपण ज्या विभागास समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल त्या विभागातील रा प महामंडळाच्या विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय, यांच्याकडे २९ जुलै-२०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत.याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विभाग नियंत्रक,विभागीय कार्यालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळ, बार्शी रोड,धाराशिव यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.असे विभाग नियंत्रक,धाराशिव यांनी कळविले आहे.
*