धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत : फिर्यादी नामे-संतोष मारुती सारने, वय 42 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना दि. 04.06.2024 रोजी 17.00 ते 05.06.2024 रोजी 17.10 वा. सु.अणदुर येथे असताना आरोपी नामे- रवी कुमार मोबाईल नं 7439298694 वरुन कॉल करुन एस. बी.आय क्रेडीट कार्ड ऑफीसमधून बोलत आहे व तुमचे क्रेडीट कार्ड अपडेट करुन घ्या नाहीतर कार्ड ब्लॅॉक होईल व तुम्हाला 600 ₹ दंड लागेल असे सांगून ओटीपी मागवून घेवून क्रेडीट कार्ड मधून 65,784 ₹काढून घेवून संतोष सारने यांची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष सारने यांनी दि.04.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 420 सह आय. टी. ॲक्ट, कलम 66 सी, 66 डी अन्वये गुन्हा नोंदवला आहे.