Dharashiv / Osmanabad
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शनिवार दि.29.06.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 09 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 130 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 90 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 21,345 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 09 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)उमरगा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- शिवराज गोविंद कावळे, वय 45 वर्षे, रा गौतम नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.45 वा. सु. महात्मा फुले नगर उमरगा येथे बालाजी मंदीराच्या पाठीमागे अंदाजे 3,100 ₹ किंमतीची 30 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे- पोपट व्यंकट सुर्यवंशी, वय 33 वर्षे, रा तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. वडार गल्ली तुरोरी येथे आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,100 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
2)परंडा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- किरणकुमार गोकुळ सरक, वय 30 वर्षे, रा. वडणेर ता. परंडा जि. धाराशिव हे 12.20 वा. सु. वडणेर ते शिराळा जाणारे रोडलगत असलेल्या सरकार हॉटेलचे बाजूला मोकळे जागेत वडणेर येथे अंदाजे 1,000 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- सोहेल गौस पठाण, वय 24 वर्षे, रा समता नगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव हे 12.20 वा. सु. कुर्डूवाडी रोड परंडा येथे के बी एस फेब्रीकेशन वेल्डींग दुकानाच्या डाव्या बाजूला मोकळ्या जागेत अंदाजे 2,200 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 22 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
3)बेंबळी पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे- संजय मन्नन बिस्वास, वय 42 वर्षे, रा. शिवली ता.औसा जि. लातुर हे 12.45 वा. सु. औसा ते धाराशिव रोडच्या कडेला असलेल्या मेंढा शिवार येथील पत्राचे बाजूस अंदाजे 1,435₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 41 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे- रामप्रसाद अशोक साठे, वय 38 वर्षे, रा तोरंबा ता. जि. धाराशिव हे 16.20 वा. सु. तुळजापूर ते औसा जाणारे एनएच 361 हायवे ताकविकी शिवारात हॉटेल सावली धाबा येथे अंदाजे 1,950 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
4)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने एक ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे- महादेव पांडुरंग जाधव, वय 60 वर्षे, रा. रामपूर ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.40 वा. सु. शिवाजी नगर तांडाच्या पुर्व बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
5)भुम पो. ठाणेच्या पथकाने एक ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे- सुभाष साहेबा काळे, वय 42 वर्षे, रा. बऱ्हाणपुर ता. भुम जि. धाराशिव हे 20.30 वा. सु अंदाजे 4,500 ₹ किंमतीची 45 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
6)येरमाळा पो. ठाणेच्या पथकाने एक ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे- रामेश्वर शिवाजी शिंदे, वय 29 वर्षे, रा. पानगाव ता. कळंब जि. धाराशिव हे 19.20 वा. सु अंदाजे 560 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आहेत अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.