Dharashiv – केंद्र सरकारने कांद्याचा दर ठरवण्याचे अधिकार वाणिज्य मंत्रालयाला दिले असल्याचा निर्णय स्वागतार्ह असून उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्यावरूनच भाजपला फटका बसला त्यानंतर आता कांद्याचे दर ठरवण्याचा निर्णय वाणिज्य मंत्रालयाला दिला आहेत. पण हा निर्णय नुसता देऊन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी देखील झाली पाहिजे असं मत देखील ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे. या अगोदर सोयाबीन, दूध दराबाबतीत जसे झाले तसचं कांद्याबाबतीत होऊ नये जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. असे म्हणत हे उशिरा सुचलेलं शहाणपण अशी टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.