देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा प्रचार ,‘संतवचन’ नावाने समाजमाध्यमावर सिरिज

Spread the love

देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा प्रचार ,‘संतवचन’ नावाने समाजमाध्यमावर सिरिज

  • समाजमाध्यमाचा असाही एक वापर
  • 15 एप्रिलपासून दररोज करीत आहेत एक पोस्ट
  • जगदगुरु तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांचे ओवी किंवा अभंगांचा संदर्भ देत त्यादृष्टीने मोदी सरकारमध्ये काय काम झाले आहे, याचा दाखला देत आहेत.
  • मतदानासंबंधी आवाहन करताना मतदानाच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संदेश.
  • ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, कू, टेलिग्राम, शेअरचॅट, व्हॉटसअ‍ॅप अशा सर्व माध्यमांतून मोदींच्या योजनांचा प्रचार…
  • देवेंद्र फडणवीसांचे ट्विटरवर 59 लाख फॉलोेअर्स, फेसबुकवर 92 लाख फॉलोअर्स, इस्टाग्रामवर 20 लाख फॉलोअर्स, कू वर 9 लाख फॉलोअर्स, शिवाय व्हॉटसअ‍ॅप आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमांतून कोट्यवधी लोकांपर्यंत थेट संपर्क
  • 20 मे पर्यंत सुरु राहणार, ही संतवचन सिरिज.
  • याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा आहे. आपल्या संतसाहित्यात विकासाच्या अनेक संकल्पना सापडतात. आज केंद्रातील मोदी सरकार जी कामे करते आहे, त्यात संतांचा संदेश कसा हुबेहुब आढळून येतो, हेच सप्रमाण देण्यासाठी ही एक अभिनव कल्पना सूचली आणि त्यादृष्टीनेच 15 एप्रिलपासून मी दररोज एक ट्विट करीत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपेपर्यंत 20 मे पर्यंत मी दररोज एक अशी एक पोस्ट माझ्या समाजमाध्यमांवरील सर्वच व्यासपीठांवर करणार आहे. यामाध्यमातून कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1786953991018229816?t=VaXHUFv2xjL-BagOVvkLjg&s=19

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!