धाराशिव ता. 1 –तेरणा शेतकरी साखर कारखाना भैरवनाथ शुगरकडे घेण्यासाठी तानाजी सावंत कोणाकोणाकडे हिंडत होते. त्यांची कारखाना घेण्याची धडपड धाराशिव जिल्हयात नव्हे तर प्रसार माध्यमाच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. न्यायालयाचे उंबरठे झिजवून झाल्यानंतर तेरणा कसा पदरात पाडला ते सर्वश्रुत आहे. समाज माध्यमावरील मुलाखतील स्वत:च याची कबुली देणाऱ्या व भंगार चोरले म्हणणाऱ्या सावंताने मग कारखाना घेण्यासाठी एवढी धडपड का केली ? तिथ सगळ भंगार होत मग तुला ते घेण्यासाठी अनेकांचे उंबरठे कसे झिजवावे लागले हे तुच सांगत होतास या प्रश्नाचे उत्तर द्यावे असे आव्हान ओमराजे निंबाळकर यानी प्रा.सावंत याना दिले आहे. (जवळा ता.परंडा) येथील प्रचारसभेत बोलत होते.
ओमराजे म्हणाले की, स्वार्थासाठी पक्ष बदलुन जात स्वतःचा विचार करणारे लोक माझ्यावर बोलत आहेत. ज्या पक्षाने याना आमदार केले मंत्री केले त्यांची फसवणुक करणारा हा माणुस. ज्याने भाजपशी संगणमत करुन फोडफोडी करण्यासाठी दिडशे बैठका घेतल्याचे सांगितले. ज्या पक्षप्रमुखाने आपले कसलेही अस्तित्व नसताना एवढे दिलेले असतानाही याने गद्दारी केली. आता याने माझ्यावर टिका करण्यास सूरु केली माझ्यावर टिका केली ती मी सहन केली.मात्र याने माझ्या स्वर्गवासी झालेल्या वडीलाबद्दल अपशब्द वापरण्याचे धाडस केले. तरीही मी त्याला समज दिली होती, मात्र तरी हा बाबा बोलतच सुटला आहे. याला आता सोडणार नाही हे त्याने लक्षात घ्यावे, तुला काही बोलायच नाही म्हणजे तु आमच्या वडीलावर बोलणार का असा प्रश्न त्यानी विचारला.
तेरणा कारखान्यावरुन हा माणुस माझ्यावर टिका करत आहे, तेरणा कारखाना माझ्याकडे आला तेव्हा 427 कोटी रुपयाचे कर्ज कारखान्यावर होते. त्यातील मी 227 कोटीचे कर्ज फेडले. पण नंतर राजकारण करुन या कारखान्याला कर्ज मिळु नये यासाठी अडचणी निर्माण केल्या. सत्ता विरोधात असतानाही मी शेवटपर्यंत कारखाना सूरु रहावा यासाठी प्रयत्न केले पण तु ज्यांच्याजवळ बसला त्यानेच कारखाना बंद पाडण्याचे काम केले असल्याचे ओमराजे यानी यावेळी सांगितले. दुसरी टिका जिल्हा बँकेच्या बाबतीत केली,बँकेने ठेवी नागपुर बँकेमध्ये ठेवल्या होत्या, तेव्हा नागपुर बँकेच्या बाबतीत अडचणी झाल्या त्यामध्ये जिल्हा बँक ठेवीदार होती, त्याचा काय दोष पण विनाकारण त्यावेळी पवनराजे साहेबावर आरोप करण्यात आले. आता हा माणुस उठुन राजेसाहेबावर टिका करु लागला आहे,त्याला त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचे खासदार ओमराजे यानी सांगितले.
या प्रसंगी जावळा ता. परंडा येथे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील, माजी आमदार राहुल भैय्या मोटे, रणजित पाटील, प्रताप भैय्या पाटील, डॉ. चेतन बोराडे, मेघराज पाटील, रणजित भैय्या मोटे, महादेव खैरे, धनंजय हांडे, संजय पवार, हनुमंत पाटील, अशोक गवारे, तात्यासाहेब गोरे, दादा गायकवाड, भाऊसाहेब गवारे, पुंडलिक गवारे, प्रकाश कारकर, शंकर इतापे, शब्बीर पठाण, बंडु रगडे, बुध्दीवान लटके, बुध्दीवान कोडगे, विश्वास काटे, अक्षय गव्हाणे, गणेश गवारे, परमेश्वर गवारे, इशान काझी, धनंजय गवारे, धनाजी गवारे, राजाभाऊ घोडके, बाबा गवारे, भारत गवारे, अनिल लाकोळे, हारुण मुल्ला, हेमंत कारकर, आत्माराम कारकर, नवजिवन चौधरी, नवनाथ गवारे, सागर कांगरे, रणजित आंधारे, श्रीगणेश चौबे, आदीसह नागरीक व ग्रामस्थ उपस्थीत होते.