धाराशिव ता.30- विरोधक लोकांना खरेदी करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. मटनाच्या जेवणाच्या पंगती गावोगाव उठत आहेत, प्रामाणिक जनता अशा गोष्टीना भुलत नसतात हे विरोधकांना निकालानंतर कळेल असा विश्वास ओमराजे यानी व्यक्त केला आहे. ते तेरखेडा (ता.वाशी) येथील प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी ओमराजे म्हणाले की, प्रचारात जनता आपल्याला प्रतिसाद देत नसल्याचे दिसत असल्याने विरोधकांनी शेवटी साम,दाम,दंड,भेदाचा अवलंब केला आहे. कोण आपला प्रचार करत असेल तर त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. बुथनिहाय आतापासुन पैशाचा वापर सूरु केला असुन तोच पैसा जनता माझ्याकडे घेऊन येत असल्याचे दिसत आहे. तेव्हा कार्यकर्त्यांना मी विचारणा केल्यानंतर त्यांच्याकडुन समर्पक उत्तर देण्यात आले. बेईमानीला बेईमानीने उत्तर देणे हीच खरी ईमानदारी असल्याचे तो कार्यकर्ता म्हणाला. गावानिहाय पंगती उठविल्या जात आहेत अन दुसरीकडे मला लोक देणगी देत आहेत. यावरुन जनतेच्या मनात काय आहे हे वेगळ सांगायची आवश्यकता नसल्याचे खासदार ओमराजे म्हणाले. पन्नास खोके घेऊन निष्ठा खुंटीवर टांगणाऱ्या या नेत्यांची गद्दारी लोकांना आवडलेली नाही. जनता आता संधीची वाट पाहत आहे. पक्ष बदलुन सत्तेसाठी व पदासाठी स्वार्थी राजकारण करत आहेत. त्याचवेळी कोणत्याही आमिषाला किंवा प्रलोभणाला आपण बळी पडलो नाही. याचे स्वागत लोकांतुन होत आहे, लोक सभेला उत्स्फुर्तपणे हजेरी लावत आहेत,
कोणालाही गाडी पाठविण्याची आवश्यकता मला पडली नाही हीच माझ्या विजयाची खात्री असल्याचे ओमराजे यानी यावेळी सांगितले. मी पाच वर्षापासुन लोकांच्या संपर्कात आहे त्याचा धसका विरोधकांनी घेतला आहे, विरोधक मी संपर्कात असण्यावर शंका घेऊ लागले आहेत, आता लोकाच्या सुखदुखात धावुन येणारा खासदार याना नको असेल तर मग नेमक विरोधकांना काय हवय असा प्रश्न ओमराजे यानी विचारला.
यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील,माजी आमदार राहुल भैय्या मोटे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस प्रतापसिंह पाटील यांच्या उपस्थितीत धाराशिव लोकसभा मतदारसंघाची प्रचार सभा पार पडली.