धाराशिव : सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही माणसं महत्वकांक्षीपोटी जबरदस्तीने लोकांवर अन्याय करण्यामध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. पाटील कुटुंबींयांना धाराशिव जिल्हयाच्या राजकरणातून हद्दपार करा यांच्या त्रासाला कंटाळून चांगले लोक राजकारणातुन निघून गेले आहेत. आजपर्यंत यांनी फक्त स्वतःचाच विकास केला आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे तेरणा चॅरीटेबल ट्रस्टवरती 11 विश्वस्तापैकी 06 हे 06 विश्वस्त हे डॉ. पाटील यांच्या कुटुंबातील असून इतर त्यांच्या राजकारणाशी संबंधीत व हितसंबंध असलेले लोक आहेत. जिल्हामध्ये तेरणा ट्रस्ट संभाळण्याची कुवत फक्त एकटया पाटील कुटुंबीकडेच आहे का ? आजपर्यंत धाराशिव जिल्हा यांनी आपल्या हव्यासापोटी असाच मागास ठेवला आहे. अशा प्रवृत्तीच्या पाटील कुटुंबांना धडा शिकविण्यासाठी यांना पराभुत करून चिरंजीव ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना निवडून द्यावे अशी भावनिक साद मतदारांना घालत आहेत. डॉ पाटील कुटुंबांला स्वतःच्या भावाची दयामाया आली नाही राजकरणासाठी त्यांनी माझे पती पवन राजेनिंबाळकर साहेबांची सुपारी देवून हत्या घडवून आणली. ज्यांना राजकरणाच्या प्रेमापोटी स्वत:चा भावाची हत्या केली हे लोक तुमचं काय भलं करणार? जिल्हयाचा काय विकास करणार? आनंदीदेवी राजेनिंबाळकर या पहिल्यांदाच प्रचारात सक्रिय झाल्या असून मतदार संघात प्रचारात दिसुन येत आहेत त्यांच्या प्रचारादरम्यान जनतेतुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आळणी गावातुन प्रचाराचा शुभारंभ करून आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी जनतेला साद घालत आहेत. त्यांच्यासोबत कै. पवनराजे निंबाळकर यांच्या बहिण शिलाताई पाटील, अनुराधा जाचक गोवर्धनवाडी सरपंच निलावती लोमटे याही प्रचारात उतरल्या आहेत. आळणी येथील महिला साधना कोरे,नंदाबाई कोरे, विद्या वीर, उमाताई माळी, जयश्री वीर, ज्योती वीर, रत्नमाला वीर, दैवशाला तोडकर, रेणुका वीर, राधा वीर,जयश्री कोरे,शितुजा कोरे, काँग्रेस पक्षाचे विनोद वीर,रवि कोरे आळणीकर,ग्रामपंचायत सदस्य विनोद लावंड, ग्रामपंचायत सदस्य अनंत बापु खोबरे,माजी ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ किरदत्त,सुनिल माळी,बबलू तोडकर,युवासेना तालुका प्रमुख वैभव वीर,शिवसेना शाखा प्रमुख अजित वीर, शामसुंदर लावंड,अंबरूषी कोरे, अंकुश काका कोरे,विश्वजित वीर,समर्थ वीर,यांच्यासह महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा-आनंदिदेवी राजेनिंबाळकर यांचे अवाहन
Leave a comment
Leave a comment