धाराशिव : शिंगोली येथील आश्रम शाळेमध्ये मुख्याध्यापक लक्ष्मण बुवासाहेब पडवळ बापू यांचा सेवापुर्ती अभिष्ठचिंतन सोहळा जि.प . कें . प्रा . शाळा उपळे ( मा) येथे उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण विस्तार अधिकारी श्री प्रकाशजी पारवे साहेब , प्रमुख पाहुणे श्री अनुरथजी नागटिळक साहेब, केंद्रप्रमुख, शेषेराव राठोड व सत्कार मुर्ती मा. श्री . एल . बी . पडवळ (बापू) सपत्नीक कार्यक्रमासाठी उपस्थित होते . श्री हणुमंत पडवळ सरांनी बापूच्या कार्याची माहिती दिली . त्यांचे प्राथमिक शिक्षण याच शाळेत व सेवापुर्ती सत्कार सुद्धा याच शाळेत . बापूंनी शिक्षक संघटनेचे काम व शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी कार्य केले . केंद्रप्रमुख अनुरथजी नागटिळक साहेबांनी बापूच्या साधी राहणी व उच्च विचार सरणी या बद्दल माहिती दिली . त्यांचा गुण म्हणजे सर्वधर्म समभाव विचार अंगी असलेला व प्रसिद्धी पासून दूर राहणे . श्रीबाळासाहेब शिन्दे सर यांनी त्यांच्या अंगी असलेला प्रामाणिक पणा, वक्तशीर पणा, प्रचंड कष्ट करण्याची तयारी, विद्यार्थी व शिक्षकांना मदत करणे . श्रीमती कांन्ती मते मॅडम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ते त्यांना आदर्श नेता, शिक्षक व पालक वाटतात व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा त्यांनी दिल्या . बापू यांनी आपल्या भाषणात तरूण शिक्षकांनी आपल्या कार्याचा ठसा ठळकपणे उमटाविणे अत्यंत आवश्यक आहे . असे मत मांडले . यावेळी श्री सतीश शहाजी कुंभार , अध्यक्ष, आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना शिंगोली धाराशिव यांनी बापूंना छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्य अभिषेक सोहळा प्रतिमा , श्रीफळ, हार, पुष्पगुच्छा देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला . याप्रसंगी श्री शेख अब्बास अली (पर्यवेक्षक ), श्री . शानिमे कैलास, कोणदे मल्लिनाथ, रेवा चव्हाण, स्वामी मॅडम, सोनाली आरडले मॅडम , मडके सर , राजाभाऊ गाढवे सर व श्री बाळासाहेब जमाले, सुनील चव्हाण सर कार्यक्रमासाठी उपस्थित होते
मुख्याध्यापक लक्ष्मण बुवासाहेब पडवळ बापू यांचा सेवापुर्ती अभिष्ठचिंतन सोहळा
You Might Also Like
TAGGED:
election
Sign Up For Daily Newsletter
Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
antarsanwadnews.com
Leave a comment
Leave a comment
Stay Connected
- Advertisement -