नाईचाकूर, नारंगवाडी, कवठा, राजेगाव येथे प्रचारसभा , कॉर्नर बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला

Spread the love

 उमरगा :

माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि भूकंपग्रस्त भागातील जनतेचे अत्यंत जिव्हाळ्याचे नाते आहे. किल्लारी भूकंपकाळात डॉ. पाटील यांनी केलेले कार्य न विसरता येण्यासारखे आहे. पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी या भागात कोल्हापुरी पद्धतीची बंधारे, साठवण तलाव आणि सिंचनाच्या अनेक योजना राबवून हा भाग सुजलाम सुफलाम केला आहे. त्यांच्याप्रमाणेच जनहिताची कामे करण्याची संधी मतदारांनी द्यावी, असे आवाहन महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी केले.

उमरगा तालुक्यातील नाईचाकूर, नारंगवाडी, कवठा, राजेगाव येथे सोमवारी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारसभा पार पडल्या. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले,बापूराव पाटील,सुरेश बिराजदार, अभय चालुक्य, दिलीपसिंग गौतम, आकांक्षा चौगुले यांनी आपल्या मनोगतात नरेंद्र मोदींसह सर्वसामान्यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी अर्चनाताई पाटील यांना विजयी करावयाचे आहे. त्यासाठी मतदारांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारास आपले अमूल्य मत द्यावे, असे आवाहन केले.

डॉ. पद्मसिंह पाटील हे खासदार असताना या मतदार संघातील 70 टक्क्यांपेक्षा जास्त गावांना खासदार निधी दिलेला आहे. त्या मानाने आजच्या खासदाराने किती निधी दिला हा संशोधनाचा भाग आहे. आपण जिल्हा परिषद उपाध्यक्षा असताना शाळा, तीर्थक्षेत्र, रस्ते आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. या भागात आणखी विकास निधी खेचून आणण्यासाठी आपल्या हक्काच्या महायुतीला साथ द्यावी, असे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी केले.

या प्रचारसभांना दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, शहाजी पाटील, शितलताई पाटील, गोविंदराव पवार, सुनील माने,बी. के. पवार, हरी भोसले, नितीन पाटील, चंद्रकांत मुळे, आकाश पवार,  अनिल बिराजदार, पिंटू साखरे, संजय पवार, सिद्धेश्वर माने, विठ्ठल चिकुंद्रे, प्रदीप सांगवे, अजित पाटील, अमोल पाटील, शमशुद्दीन जमादार, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!