धाराशिव,दि.22(माध्यम कक्ष) लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत माध्यम कक्ष आणि माध्यम व प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांना समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी आज 7 मे 2024 रोजी 40-उस्मानाबाद मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणूकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा दिली.
यावेळी “आम्ही भारताचे नागरीक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की,आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करुन आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश,जात,समाज व भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु.” अशी प्रतिज्ञा घेण्यात आली.
तत्पूर्वी जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी विवेक खडसे यांनी सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना मतदान करण्याचे आवाहन करुन लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मतदान करावे.असे सांगितले.
याप्रसंगी पत्रकार रवींद्र केसकर,शीतल वाघमारे,प्रा.डॉ.जी.टी. जमादार,प्रा.शरीफ शेख,प्रा.बी.एस. उडचण,सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव,रेणूका राठोड,प्रा. उमेश नरवडे,अमोल सोलनकर,युसुफ मोमीन,नंदू पवार,चित्रा घोडके,संदीप उंडे,विनोद जानराव,सुनिल माळी, अनिल वाघमारे,श्रीकांत देशमुख, वैभव पाटील,राधा पैकीकर व नेहा वैरागे आदी उपस्थितांनी मतदानाची प्रतिज्ञा घेतली.