धाराशिव: उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा प्रचार टिपेला पोचला असून महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील व राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार केलेल्या योजनेचा बुरखा फाडला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचा नेरुळ येथील तेरणा स्पेशलिटी हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंन्टर येथे मोफत उपचार केला आहे, अशी दिशाभूल करत आहेत. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात महायुतीकडून अर्चना राणाजगजीतसिंह पाटील या निवडणूक लढवत असून निवडणूक प्रचारादरम्यान आपल्या ट्रस्टमार्फत जिल्हाभरातील नागरिकांना मोफत उपचार देत असल्याचे सांगत आहे या ट्रस्टमार्फत जिल्ह्यातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात तर उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांकडून आधार कार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे कशासाठी घेतली जातात असा प्रश्न केला आहे? हे ट्रस्ट एकीकडे नागरिकांना मोफत उपचार केला असल्याचे भासवत असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेत आहे. सन 2012 ते 2023 या 11 वर्षाच्या कालावधीमध्ये एकुण 6,797 रुग्णांना मोफत उपचारासाठी दाखल करुन घेतले असून प्रत्यक्षात 4344 रुग्णांच्या उपचाराकरीता महाराष्ट्र राज्य शासनाकडून रक्कम रु. 18,23,71,248/- (रक्कम रुपये आठरा कोटी तेवीस लक्ष एक्काहत्तर हजार दोनशे आठेचाळीस) रुपये एवढी रक्कम तेरणा स्पेशलिटी हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंन्टरच्या खात्यावरती महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत प्राप्त झाली आहे.
सदर ट्रस्टमार्फत जर मोफत उपचार केले जात आहेत तर नागरिकांकडून आवश्यक ती कागदपत्रे जसे की आधार कार्ड रेशन कार्ड आणि अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशाकरिता केली जात आहे याच कागदपत्राच्या आधारे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सहायता निधी व केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालया अंतर्गत विविध योजना अंतर्गत दाखवून शासनाचे कोट्यावधी रुपये घेतले जात असल्याचे दाखवून दिले सदर उमेदवार लोकांची दिशाभूल करत आहेत. निवडणूक प्रचार दरम्यान खा. ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रत्यक्ष पुराव्यानुसार नागरिकांना दाखवून दिले आहे.
मोफत उपचार करत असल्याचे पाटील कुटुंबियांचे पितळ उघडे पडले असून शासनाकडून कोटयावधी रुपयाची रक्कम घेवून मोफत उपचार केला इतके खोटे केवळ पाटील कुटुंबातील सदस्यच बोलू शकतात. मल्हार पाटील यांनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यापुर्वी एकदा तेरणा पब्लीक चॅरीटेबल ट्रस्टच्या विश्वस्त 11 विश्वस्त पैकी 5 सदस्य हे घराणेशाहीचे प्रतीक नाहीत का हे पहावे. पद्मसिंह पाटील त्यांचे व्याही आशोक वामन आहेत, राणाजगजीतसिंह पाटील, पृथ्वीराज पाटील, मल्हार पाटील हे कोण आहेत हे एकदा तपासून घ्यावेत.
आज भिकार सारोळा, आरणी, सुंभा, समुद्रवाणी, कामेगाव, पळसप, आदी गावांच्या गावभेटी प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षनाताई सलगर,युवासेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे,डी.सी.सी चे संचालक संजय देशमुख,तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, रवि कोरे आळणीकर,पांडुरंग शिंदे,परिष शिंदे,बापु हारकर,शिवयोगी चपने,शिवप्रताप कोळी,युवासेना उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे,उपस्थित होते. तसेच आण्णासाहेब तनमोर, औदुंबर पाटील, शिवराम पाटील, प्रविण पाटील (मुन्ना), लक्ष्मण पुंड, सतीश शिंदे, मुरहरी पाटील, भिमाशंकर तनमोर, पांडुरंग शिंदे, परीश शिंदे, बापु हारकर, श्रीमंत पाटील, सागर कोळपे, श्रीमंत पाटील, मधुकर शिंदे, जनार्धन शिंदे, राजाभाऊ शिंदे, प्रमोद लाकाळ, विष्णु ढवळे, बाबासाहेब कदम, शिवाजी कापसे, दादासाहेब मोरे, मारुती कदम, श्रीनिवास बचाटे, आप्पा मोहीते, बाबा मुंडे, आण्णासाहेब देशमुख आदी नागरीक उपस्थीत होते.