धाराशिव : धाराशिव तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील आंबेजळगा येथील दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी फिर्यादी नामे हनुमंत ननवरे यांनी पो.स्टे धाराशिव ग्रामीण येथे फिर्याद दिली की त्यांचे मित्र आनंद अरुण क्षीरसागर हे गेल्या तीन महिन्यापूर्वी त्यांचे घराला कुलूप लावून त्यांचे नोकरीचे ठिकाणे आर्मी मध्ये गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी रात्री 12:30 ते 05:30 वाजण्याचे दरम्यान त्यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील एक टीव्ही साऊंड होम थेटर व इतर मुद्देमाल असा एकूण 68,000 रुपयाचा चोरून नेहले असा फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीवरून पो.स्टे.ग्रामीण येथे गुन्हा दाखल झाला.
पो.स्टे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक मारुती शेळके व त्यांची टीम मधील पी एस आय बनसोडे, पोलीस वाहेद मुल्ला, भीमराव ढगे, जोती गिरी, लियाकत पठाण बाबा शेख, शँकर तलवारे आदी नी आज रोजी सांजा भागातून आरोपी अजय श्रावण शिंदे रा.सुंभा यास पकडून त्याचे कडून गुन्यातील मुद्देमाल पैकी एक टी.व्ही व होम थेटर जप्त केला असून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरु असून आरोपी अटक करण्यात आले आहे. या चोरीचा गुन्हा पोलिसांनी 24 तासाच्या आत मध्ये उघडकीस आणला आहे.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.