Dharashiv :
धाराशिव : धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील आज दुपारी ३ वाजता सौ.अर्चनाताई पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश होणार आहे.त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे व त्यात उमेदवारी घोषित होणार आहे. मुंबई येथे पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार असुन त्यानंतर त्यांच्या नावाची लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून घोषणा होऊ शकते.
अर्चना पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचे संघटन निर्माण केले आहे तसेच बचत गटांच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक छोट्या छोट्या गावाच्या घरापर्यंत पोहोचल्या आहेत. अर्चना पाटील यांनी पुण्यातील महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.