पत्रकार रवींद्र केसकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍यांवर कठोर कारवाई करा , जिल्हाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षकांना पत्रकारांचे निवेदन

Spread the love

Dharashiv – osmanabad

धाराशिव –
महाराष्ट्रात पत्रकारांवर भ्याड हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच धाराशिव येथील दैनिक लोकसत्ता व दैनिक संचारचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांसह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मंगळवारी (दि.2) पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, धाराशिव येथील दैनिक लोकसत्ता व दैनिक संचारचे जिल्हा प्रतिनिधी रवींद्र केसकर हे सोमवार, 1 एपिल 2024 रोजी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास कामकाज संपवून दुचाकीवरुन घराकडे जात होते. धाराशिव-बेंबळी रोडवर साळुंकेनगर नजीक अज्ञात चार ते पाच गुंडांनी त्यांना अडवले. त्यांना गाडीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच प्रतिकार करताच धारदार शस्त्राने चेहर्‍यावर वार केला. यात रवींद्र केसकर हे जखमी झाले. हल्लेखोरांचा पवित्रा लक्षात आल्यानंतर त्यांनी बचावासाठी आरडाओरड केली, तेव्हा रस्त्यावरुन जाणारे दुचाकीस्वार तेथे जमा होऊ लागले. तेवढ्यात हल्लेखोरांनी श्री.केसकर यांची दुचाकी घेतली आणि ते तेथून पसार झाले. ही दुचाकी दूर अंतरावर वडगाव शिवारात सोडून दिली. या घटनेमुळे पत्रकारांवर हल्लेखोरांमार्फत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे दिसून येत आहे. जीवघेणा हल्ला करणार्‍या या हल्लेखोरांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही सर्व पत्रकार बांधव करीत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी धनंजय रणदिवे, चंद्रसेन देशमुख , हुंकार बनसोडे , महेश पोतदार, जी.बी. राजपूत, मच्छिंद्र कदम, सुधीर पवार, अमोल गाडे, आरीफ शेख, संतोष जोशी, गोवर्धन वाघमारे, प्रशांत कावरे, बाळासाहेब अणदूरकर, भीमाशंकर वाघमारे, राकेश कुलकर्णी, राजाभाऊ वैद्य, शीतल वाघमारे, विकास सुर्डी, विनोद बाकले, श्रीराम क्षीरसागर, काकासाहेब कांबळे, संजय मंत्री, देवीदास पाठक, सलीम पठाण, आकाश नरोटे , अमजद सय्यद ,पांडुरंग मते, किरण कांबळे, कुंदन शिंदे,राजेश बिराजदार, कालीदास म्हेत्रे, शिवराज गव्हाणे, दीपक जाधव, सुभाष कदम पाटील, बापू जगदे, मल्लिकार्जुन सोनवणे, रहीम शेख, कलीम मुसा सय्यद , अमोल गाडे, बाबासाहेब अंधारे , विनोद कोकाटे, अजित माळी यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनाही पाठविण्यात आली आहे. 


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!