महाराष्ट्र : राज्यात लोकसभेची निवडणूक सुरू आहे. जागावाटपाचा तिढा निर्माण झालेला आपण पाहत आहोत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच शासकीय निवासस्थान बनलं सर्वपक्षीय तक्रार निवारण केंद्र बनवले आहे. उमेदवार निवडीपासून ते उमेदवाराबद्दल नाराजी सांगण्यासाठी सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकार्यांचा रेटाच संपेना सा झालं आहे.
फडणवीसांकडून प्रत्येकाला वेळ देत विषय मार्गी लावण्याचा धडाका सुरूच आहे. आज नाशिक भाजपचे पदाधिकारी घेणार फडणवीसांची भेट घेणार आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातून अजून उमेदवार घोषित झाललेला नाही. नाशिकची जागा भाजपनं लढावी याबद्दल भाजप पदाधिकारी आग्रही आहेत मात्र ही जागा शिंदे गटाकडे आहे.
हेमंत गोडसे यांच्याबाबत राष्ट्रवादीचाही एक गट नाराज असल्याचे निदर्शनास येतं आहे. त्यामुळ आता आपली बाजू मांडण्यासाठी भाजपचे पदाधिकारी सागरवर दाखल झाल्याचे माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच शासकीय निवासस्थान सर्वपक्षीय तक्रार निवारण केंद्र बनवले आहे.असे चित्र दिसत आहे.