पोलीस शिपाई चालक भरती 2022-2023 – Police Constable Driver Recruitment
धाराशिव :
महाराष्ट्र सहायक पोलीस उपरिरीक्षक चालक,पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, 2019 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 27.06.2022 ते दिंनाक 23.09.2022 अन्वये सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतदीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक(44) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी देखील आवेदनत्र संगणकीय प्रणालीद्वारे दि. 05.03.2024 ते दि. 31.03.2024 या कालावधीत स्विकारण्यात येतील ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिध्द करण्यात आली आहे.
1) उमेदवारास पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.
2) उमेदवार एका पदाकरिता संपुर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करु शकतो.
3) उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
4)पोलीस शिपाई चालक या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची चाचणी परिक्षा घेण्यात येईल सदर शारिरीक चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार, संबधिंत प्रवर्गातील ताहिरातीत नमुद केलेल्या रिक्त जागांच्या 1.10 या प्रमाणात उमेदवार लेखी परिक्षासाठी पात्र आहे.
5) लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेलृया उमेदवारांना, हलके वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणंची अशी एकुण 50 गुणांची कौश्ल्य चाचणी द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये उकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. कौश्ल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असुन कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावायाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. कौश्ल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
6) सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
7) शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमुद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्तायादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसुचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मुळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवरांचा निवडसुचीमध्ये समावेश केला जाईल. निवडसुचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (provisional selection* असेल. शारिरीक चाचणी व लेखी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.10.12.2020 नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यात येईल.
8)पोलीस शिपाई चालक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेलली प्रमाणपत्र/कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सुचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलबध्द आहेत. सदरहु जाहिरात उमेदवारांनी काळजीपुर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घ्ज्ञेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.
9)भरती प्रक्रियेदरम्यान शारिरीक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चीत केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यास भरती प्रक्रियेतुन बाद ठरविण्यात येईल. कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांकामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही.
10)उमेदवारांनी संकेतस्थळावर जावून आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे. त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात(Unreserved) अर्ज करु शकतात, परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करु शकणार नाहीत.
11) पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वाच्च न्यायलयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 28306/2017 बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहुन व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक 175/2018 व इतर संलग्न याचिकांमध्ये दिंनाक 27.06.2019 रोजी दिलेल्या निर्ण्यायाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्ण्यायाच्या अधिन राहुन रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकारी आहे. अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.