धाराशिव :
जलसंधारण व मृद विभागाची अराजपत्रीत व अधिकारी गटाची परिक्षा रद्द करुन नव्याने अधिकृत टीसीएस केंद्रावर परिक्षा तात्काळ घेण्यात यावी, अशी मागणी राष्टÑवादीचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शुक्रवारी (दि.२३) निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात श्री. दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण व मृद विभागाची अधिकारी गट व अराजपत्रीत पदाच्या परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ व पेपर फुटी झाल्याने अशा स्वरुपाच्या परिक्षा तात्काळ रद्द करुन नव्याने टी.सी.एस.अधिकृत केंद्रावर परिक्षा घेण्यात याव्यात. राज्यातील गोर-गरीब, होतकरु, प्रामाणीकपणे रात्रंदिवस अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांच्या समोरच परिक्षा केंद्रावर पेपर फुटी व गोंधळ बघून त्यांची मानसिकता खालावली असून विद्यार्थ्यांत याबाबत चिड निर्माण होत आहे. या पेपर फुटी व गोंधळ करणाºया दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी व विद्यार्थ्यांच्या नव्याने परिक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे
अराजपत्रीत, अधिकारी गटाची परिक्षा रद्द करुन नव्याने घ्या
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दुधगावकरांची मंत्री राठोड यांच्याकडे मागणी
Leave a comment
Leave a comment