पारगाव येथील दोन विद्यार्थिनी डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी घेतल्या दत्तक , अपघातात मृत्यू पावलेल्या चादर यांच्या कुटुंबियांना दिला आधार
अपघातात मृत्यू पावलेल्या बालाजी चादर यांच्या कुटुंबियांना दिला आधार
धाराशिव प्रतिनिधी -वाशी तालुक्यातील पारगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील हे अपघातात काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेले बालाजी चादर यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी चादर कुटुंबीयांची परिस्थिती पाहून व लहान मुलीकडे पाहून त्यांचे संवेदनशील मन जागे झाले आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी दोन्ही मुलींना उच्च शिक्षण होईपर्यंत दत्तक घेण्याची हमी दिली. त्यामुळे बालाजी चादर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या दोन मुलींच्या शिक्षणाची चिंता कुटुंबीयांना होती ती चिंता मिटवण्याचे काम धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, शिवसेना भूम तालुकाप्रमुख ॲड. श्रीनिवास जाधवर,माजी उपजिल्हाप्रमुख रविंद्र धर्माधिकारी,बंडू मुळे,ॲड.महेश आखाडे,प्रदीप मोटे,बालाजी गिराम, विजय तळेकर,प्रदीप कोकणे,उपसरपंच ॲड पंकज चव्हाण बाबासाहेब गावडे,यासीन पठाण,फिरोज पठाण,रईस शेख,ऋषी राऊत,अभय थोरात,कुणाल चव्हाण आदींची उपस्थिती होती.